Defence Ministry offices : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ही कार्यालये दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असून तब्बल ७००० कर्मचारी यात काम करू शकतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार सध्या संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या कार्यालयांतून काम करतात. आता नवीन तयार होणाऱ्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये (या सर्व कर्मचाऱ्यांना स्थलांतरित होणार आहेत. Rs 775-crore Defence Ministry offices ready, to accommodate 7,000 personnel working from hutments
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ही कार्यालये दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असून तब्बल ७००० कर्मचारी यात काम करू शकतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार सध्या संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या कार्यालयांतून काम करतात. आता नवीन तयार होणाऱ्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये (या सर्व कर्मचाऱ्यांना स्थलांतरित होणार आहेत.
संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी सध्या काम करत असलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये असललेल्या वेगवेळ्या कार्यालयातील अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये आता हे सर्व कर्मचारी स्थलांतरित केले जाणार आहेत. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग परिसरात ४,५२,००० चौ. फूट परिसरात आणि चाणक्यपुरी परिसरातील आफ्रिका अव्हेन्यूमध्ये ५ लाख चौ. फूट क्षेत्रात ही कार्यालये बांधण्यात आली आहेत.
केंद्राने ७७५ करोड रुपये खर्चून ही आधुनिक कार्यालये तयार केली आहेत. नवीन डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये नौदल, आयएनएस इंडिया नेव्हल स्टेशन, आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिस यासारख्या कार्यालयांसह सीएसडी कँटीनदेखील स्थलांतरित होणार आहे. हे सर्व कार्यालये नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टसाठी मोठी जमीन मोकळी होणार आहे.
दुसरीकडे सेंट्रल व्हिस्टाचे बांधकामही वेळेआधी पूर्ण होण्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला ३५ दिवस विलंबाने सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Rs 775-crore Defence Ministry offices ready, to accommodate 7,000 personnel working from hutments
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App