वृत्तसंस्था
जम्मू : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर जी महत्त्वाची राजकीय अधिकारांची पावले उचलण्यात येत आहेत, त्यापैकी एक म्हणजे आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सर्व भारतीय नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. Right to vote for all Indians in Jammu and Kashmir!! Declaration of Election Commission; What exactly does it mean??
370 कलम लागू असताना फक्त जम्मू आणि काश्मीरच्या रहिवाशांना मतदानाचा अधिकार होता. तेथे कार्यरत असणाऱ्या बिगर काश्मिरी सरकारी कर्मचारी, सैन्यदल अधिकारी आणि सैनिक अन्य कामगार यांना हा मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु, निवडणूक आयोगाच्या ताज्या निर्णयानुसार आता या सर्वांना जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
जम्मू काश्मीर मधल्या मतदार यादीनुसार सध्या 76 लाख मतदार आहेत. परंतु, जनगणनेतील नोंदीनुसार तेथे 98 लाख नागरिक राहतात. त्यामुळे या सर्वांना आता मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन स्थानिक पक्षांच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. काश्मिरींची “काश्मिरीयत” ही ओळख पुसण्यासाठीच केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेतल्याचे पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुक्ती यांनी म्हटले आहे.
मात्र या टीकेचा कोणताही परिणाम निर्णयावर होणार नसून मतदान यादीत सर्व भारतीयांची नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी करताना पूर्वी निवासाचा दाखला अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट द्यावे लागत होते. आता ते अनिवार्य राहिलेले नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सर्व भारतीय नागरिकांना इतर राज्यांप्रमाणेच मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App