वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए.पी. अब्दुल्लाकुट्टी म्हणाले की, ‘एक राष्ट्र एक भाषा’ लागू करण्याची हीच योग्य वेळ आहे. Right time to implement ‘One Nation One Language’: BJP National Vice President Abdullakutty’s opinion
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा आवश्यक असल्याचे म्हंटले होते. तसेच हिंदी शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते म्हणाले, “आज हिंदी ही केवळ भारतीय भाषा नाही तर आंतरराष्ट्रीय भाषा देखील आहे. देशात सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा आहे. त्यामुळे तिचा स्वीकार करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रादेशिक भाषांच्या विरोधात नाही. ” ते म्हणाले. “विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूचा गैरसमज केला.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App