महाराष्ट्रातील डॉक्टरांना आंदोलनाची वेळ ,नवा आदर्श ठेवत गुजरातमधील निवासी डॉक्टरांना मिळणार पाच हजार रुपये कोविड भत्ता


महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ हजार रुपये विद्यावेतनाशिवाय हा भत्ता मिळणार आहे. Resident doctors in Gujarat will get Rs 5,000 covid allowance


विशेष प्रतिनिधी 

अहमदाबाद : महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ हजार रुपये विद्यावेतनाशिवाय हा भत्ता मिळणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांत निवासी डॉक्टर गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्याच जीवावर येथील रुग्णसेवा सुरू आहे. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांना त्यांचे विद्यावेतनही नियमित मिळत नाही. त्याचबरोबर कमी मनुष्यबळामुळे हे डॉक्टर मेटाकुटीस आले आहेत. दुसऱ्या बाजुला गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना सर्व सुविधांसह आता पाच हजार रुपये भत्ताही मिळणार आहे.

गुजरातमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार निवासी हॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मागणी केली होती. की त्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात यावी. याचे कारण म्हणजे त्यांच्या वेतनात २०१८ मध्ये वाढ झाली नव्हती. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री रुपानी यांनी विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारने हा निर्णय घेतला असताना गुजरातमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मात्र पुरेसे वेतन मिळत नाही. कारण त्यांना सर्व मिळून केवळ पाच हजार रुपये वेतन मिळत आहे. मात्र, त्यांना बारा तासांची ड्युटी करावी लागत आहे. एका निवासी डॉक्टरने सांगितले की आम्ही ९० डॉक्टर १६ एप्रिलला दुपारी तीन वाजल्यापासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. आम्ही यासंदर्भात डीनना पत्रही लिहिले आहे. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

Resident doctors in Gujarat will get Rs 5,000 covid allowance


महत्वाच्या बातम्या वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय