महात्मा गांधींचा ५००, २००० रुपयांच्या नोटांवरील फोटो हटवा, राजस्थानातील काँग्रेस आमदाराची मागणी


वृत्तसंस्था

जयपूर : महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ५००, २००० रुपयांच्या नोटांवरून गांधींचा फोटो काढून टाकाव, अशी मागणी काँग्रेसच्या राजस्थानातील आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.Remove photo of Mahatma Gandhi from Rs 500, 2000 notes, demands Congress MLA from Rajasthan

याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जास्त किंमतीच्या नोटांमधून महात्मा गांधींचा फोटो काढावा, असे आवाहन केले आहे.

५०० आणि २००० रुपयांच्या नोटा भ्रष्टाचार आणि लाचखोरीसाठी वापरल्या जात आहेत, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान होत आहे.

राजस्थानमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष वेधून, सत्ताधारी पक्षाचे आमदार भरतसिंह कुंदनपूर म्हणाले, जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान ६१६ भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असून, रोज सरासरी दोन प्रकरणे नोंदवली जात आहेत.

आमदार भरतसिंह कुंदनपूर म्हणाले की, “गांधींचा फोटो फक्त ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये असावा, कारण त्या बहुतेक गरीब वापरतात आणि गांधींनी आयुष्यभर निराधारांसाठी काम केले. माझा सल्ला असा आहे की गांधींचा फोटो ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये वापरू नये. अशोक चक्र देखील प्रभावीपणे हेतू पूर्ण करू शकते.”

Remove photo of Mahatma Gandhi from Rs 500, 2000 notes, demands Congress MLA from Rajasthan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”