आसाममध्ये BPL दारिद्र्य रेषेखालील पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत; देशातले ठरले पहिले राज्य, बाकीच्यांना इंजेक्शन घटविलेल्या किंमतीत


वृत्तसंस्था

गुवाहाटी – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात उत्पादक कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती (MRP) घटविल्या असतानाच आसाममधून एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्यात BPL अर्थात दारिद्र्य रेषेखालील पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत, तर बाकीच्यांना घटविलेल्या किंमतीत देण्याची घोषणा राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. असे महत्त्वाचे पाऊल उचलणारे आसाम हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. Remdesivir will be provided free of cost to BPL patients, Assam: State Health Department

या आधी रेमडेसिवीरच्या किंमती घटविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होतेच. त्याला प्रतिसाद देत देशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी केल्या. त्या आता देशभर ८९९ रूपये ते ३,४९० रूपये याच दरम्यान राहणार आहेत. त्यांची यादी आणि किमतीचा तक्ता केंद्रातल्या रसायन आणि खते मंत्रालयाने जारी केला आहे. या एकूण ७ कंपन्या आहेत, की ज्यांनी किमती घटविल्या आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

आसाममध्ये विधानसभेचे मतदान झाले आहे. तिथे कोरोनाचा प्रभाव वाढलेला पाहून भाजपच्या सर्वानंद सोनोवाल सरकारने BPL अर्थात दारिद्र्य रेषेखालील पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत, तर बाकीच्यांना घटविलेल्या किंमतीत देण्याची घोषणा केली आहे.

Remdesivir will be provided free of cost to BPL patients, Assam: State Health Department

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण