रॅपर हनी सिंगला गोल्डी बराडकडून जीवे मारण्याची धमकी!

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणी गोल्डी बराड फरार आहे.

विशेष प्रतिनिधी

चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी बराड याने रॅपर हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हनी सिंगने बुधवारी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. हनी सिंगने दिल्ली पोलीस मुख्यालय गाठून संपूर्ण घटना सांगितली. यासोबतच हनी सिंगने दिल्ली पोलिसांकडे सुरक्षेचीही मागणी केली आहे. Rapper Honey Singh threatened to kill by Goldie Barad

हनी सिंगने सांगितले की, ‘’मी अमेरिकेत होतो तेव्हा माझ्या मॅनेजरला फोन आला, ज्यात मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, ते चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मला वाटतं की स्पेशल सेल याबाबत चौकशी करेल. मी त्यांना सर्व माहिती आणि पुरावे दिले आहेत.’’

गोल्डी बराडचे पूर्ण नाव सतिंदरजीत सिंह आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे गँगस्टर लॉरेनस बिश्नोईचा निकटवर्तीय असलेल्या गोल्डी बराडने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासून तो फरार आहे.

Rapper Honey Singh threatened to kill by Goldie Barad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात