वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यातील निघासनमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवरील अत्याचारानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात हा खुलासा झाला आहे. हत्येनंतर त्यांना झाडावर लटकवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. दोन्ही बहिणींचा मृतदेह बुधवारी घरापासून एक किमी अंतरावर उसाच्या शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. १५ वर्षीय आणि १७ वर्षीय दोन्ही बहिणींच्या आईने बुधवारी सायंकाळी निघासन ठाण्यात अपहरण आणि हत्येची तक्रार दिली होती.Rape of two minor sisters in Lakhimpur Khiri 6 arrested for hanging corpse after murder
आईच्या आरोपानुसार, तीन तरुण आले आणि त्यांनी मुलींना बळजबरीने उचलून नेले. याच नराधमांनी त्यांना ठार करून झाडाला लटकवले. पोलिसांनी बुधवारी रात्री चालवलेल्या मोहिमेत छोटू, सोहेल, हफिजुल, करिमुद्दीन आणि आरिफ यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध हत्या, पॉक्सो अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, जुनैदला गुरुवारी सकाळी चकमकीनंतर पकडले.
त्याच्या पायाला गोळी लागली आहे. एक देशी कट्टाही जप्त केला आहे. पोलिसांनुसार, आरोपी आणि मुलींची ओळख होती. बुधवारी दुपारी मुलींना शेतात बोलावले आणि सोहेल तसेच जुनैदने त्यांच्यावर अत्याचार केला. मुली त्यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या. त्यांच्यापासून सुटका मिळावी यासाठी सोहेल, हफिजुल आणि जुनैदने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर करिमुद्दीन आणि आरिफ यांना बोलावून पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींचे मृतदेह झाडाला लटकवले. छोटू वगळता सर्व आरोपी एका गावातील आहेत. तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली. मुलींच्या वडिलांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
बलियात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत उत्तर प्रदेशच्या बलियात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बैरिया ठाणे क्षेत्रातील या घटनेत पीडितेच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २२ वर्षांच्या आरोपीला अटक केली. दोघे एकाच गावचे रहिवासी आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App