वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतून आज रविवारी रामायण सर्किट ट्रेन रवाना होत आहे. रामभक्तांना रामायण काळातील धार्मिक स्थळे या रेल्वेतून पाहता येणार आहेत. Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees
दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकातून रवाना होणारी हे रेल्वे १७ दिवसांचा प्रवास करणार आहे. जेथे जेथे राम-सीता गेले. तेथे तेथे ही रेल्वे धावणार आहे. रामायणात वर्णन केलेल्या ठिकाणांची पाहणी भक्तांना या रेल्वेच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामध्ये अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट आदी धार्मिक स्थळे भाविकांना या रेल्वेतून पाहता येतील.
विशेष म्हणजे, या रेल्वेतून भाविकांना विविध सुविधा रेल्वेने पुरविल्या आहेत. त्यामध्ये स्नानगृह, भोजन व्यवस्थेसाठी खास व्यवस्था, दोन रेस्टोरंट, अत्याधुनिक स्वयंपाकघर याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App