वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 4 राज्यांतील 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. पण, निवडणूक आयोगाने तूर्त सर्वच राज्यांतील मतमोजणी थांबवली आहे. भाजपच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक अवैध जाहीर करण्याची मागणी केली आहे. पक्षाने या दोन्ही राज्यांत गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचे शिष्टमंडळही निवडणूक आयोगाच्या दरबारात पोहोचले आहे. यात माजी मंत्री पवन बंसल, रणजीत राजन आणि विवेक तन्खा यांचा समावेश होता. Rajya Sabha polls new twist: Counting of votes in all states stopped by the Commission; Rajasthan – Cross Voting in Karnataka
तन्खा म्हणाले की, त्यांच्या पक्षाने गोपनीयतेच्या नियमाचे उल्लंघन केले नाही. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी.
तत्पूर्वी, राज्यसभेच्या राजस्थानातील 4, हरयाणाच्या 2, महाराष्ट्राच्या 6 व कर्नाटकच्या 4 जागांसाठी मतदान झाले. चारही राज्यांत मतदानावेळी मोठे राजकीय नाट्य पहावयास मिळाले. राजस्थानात भाजपच्या शोभाराणी यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले.
दुसरीकडे, कर्नाटकातही के. श्रीनिवास गौडा म्हणाले की, मी काँग्रेसला मतदान केले. कारण, मला तो पक्ष पसंत आहे. हरयाणात काँग्रेसची 2 मते बाद झाली. किरण चौधरी आणि बी. बी. बत्रा यांनी एजंटासह अन्य एका व्यक्तीला मतपत्रिका दाखविली. प्रत्यक्षात, राज्यसभेच्या 57 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. पण, 41 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित 16 जागांसाठी हे मतदान झाले.
राजस्थान : राज्यसभेच्या जागा – 4
राजस्थानातील काँग्रेसचे तिन्ही उमेदवार मुकूल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांचा विजय निश्चित आहे. येथे भाजपला जबर झटका बसला आहे. धौलपूरहून भाजप आमदार शोभाराणी कुशवाह यांनी मतदान करताना चूक केली. त्यांनी काँग्रेसच्या प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपची 2 मते बाद ठरू शकतात. शोभाराणी याच्यासह बांसवाडाच्या गढीचे भाजप आमदार कैलाश चंद मीणा यांनीही मतदान करताना चूक केली. त्यामुळे त्यांचेही मत बाद ठरण्याची शक्यता आहे. याचा निर्णय सीसीटीव्ही फुटेज पाहून घेतला जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी याची माहिती हायकमांडला दिली आहे.
तत्पूर्वी, आमदारांच्या घोडेबाजाराची भीती पाहता प्रशासनाने आमेर क्षेत्रातील इंटरनेट सुविधा 12 तासांसाठी बंद केली होती. आणखी एक प्रकरण होते बसपच्या काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांच्या मतदानाचे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी निकाल थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
कर्नाटक : राज्यसभा जागा – 4
कर्नाटकात जेडीएस नेते माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी विजयासाठी भाजपने काँग्रेसकडे मदत मागितल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -सी. टी. रवी भाजप सरचिटणीस आहेत. ते काँग्रेसच्या कार्यालयात कशाला गेले? त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या सिद्धरमैय्या यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली.
जेडीएसने सांगितले की, त्यांच्या 2 आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. नाही. एक आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी स्वतःच आपण क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट केले. तर एस. आर. श्रीनिवास यांनीही आपले मत रिक्त सोडले.
महाराष्ट्र : राज्यसभा जागा – 6
तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. कोर्टाने राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत. मलिक यांनी विधानभवनात जाण्यासाठी पोलिसांकडून एस्कॉर्टची मागणी केली होती. महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्यासाठी ओवैसींच्या एमआयएमने काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.
हरियाणा : 2 जागा
येथे काँग्रेसच्या 2 उमेदवारांचे मतदान रद्दबातल झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी आपली मतपत्रिका एजंटांसह जजपा पार्टीचे एजंट दिग्विजय चौटाला यांना दाखविले. आमदार बलराज कुंडू यांनी राज्याच्य हितासाठी कुणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगात
महाराष्ट्र आणि हरियाणातील राज्यसभा निवडणुकीविषयी भाजपच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने या दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रक्रियेविषयी तक्रार दाखल केली आहे. भाजपने महाराष्ट्रात 3 आणि हरियाणात 2 काँग्रेस आमदारांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App