वृत्तसंस्था
जयपूर (राजस्थान) : राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हिंदूंचे धार्मिक स्थान निर्माण करण्यात आले आहे आणि तेथे पूजा अन् आरती केली जाते. या आदेशानंतर वाद झाल्याने पोलीस मुख्यालयातून एक स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पोलीस ठाणे आणि कार्यालये येथे जर पूर्वीपासून धार्मिक स्थळे असतील, तर त्याला आताचा आदेश लागू होणार नाही. नव्याने बनवण्यात येणारी पोलीस ठाणी आणि कार्यालये यांना हा आदेश लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. RAJSTHAN CONGRESS GOVERNMENT: Ban on construction of temples in police stations in Rajasthan! Congress government’s anti-Hindu order through police
#Rajasthan govt bans places of worship inside #PoliceStation premises ✍🏼Manish Godha#News #FPJNews #RajyaSabha #MP #BJP https://t.co/Lna6YPqE6c — Free Press Journal (@fpjindia) October 27, 2021
#Rajasthan govt bans places of worship inside #PoliceStation premises
✍🏼Manish Godha#News #FPJNews #RajyaSabha #MP #BJP https://t.co/Lna6YPqE6c
— Free Press Journal (@fpjindia) October 27, 2021
राजस्थान पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त महासंचालक ए. पोन्नूचामी यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी हा आदेश जारी केला आहे. यात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस विभागातील विविध कार्यालये आणि परिसर येथे श्रद्धेच्या नावाखाली धार्मिक स्थळ निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे जी कायद्यानुसार योग्य नाही. ‘राजस्थान धार्मिक भवन आणि धर्मस्थळ अधिनियम १९५४’नुसार सार्वजनिक स्थानांवर धार्मिक स्थळ बांधणे अवैध आहे. पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीच्या मानचित्रामध्ये कुठेही धार्मिक स्थळ निर्माण करण्याची तरतूद नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App