राजस्थानमधील जयपूरच्या चाकसू येथे मोठा रस्ता अपघात झाला. येथे बायपासवर एका ट्रॉलीला एक इको व्हॅन धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा (आरईईटी) परीक्षा देण्यासाठी बारां या गावाहून सीकरला जात होते. Rajasthan horrific road accident in chaksu 6 including van driver who came to take reet exam died 5 injured
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमधील जयपूरच्या चाकसू येथे मोठा रस्ता अपघात झाला. येथे बायपासवर एका ट्रॉलीला एक इको व्हॅन धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा (आरईईटी) परीक्षा देण्यासाठी बारां या गावाहून सीकरला जात होते.
व्हॅनमध्ये 10 जण होते असे सांगितले जात आहे. यातील बहुतांश जण आरईईटी परीक्षेसाठी बारांहून सीकरला जात होते. वाटेत अनियंत्रित होऊन व्हॅनने मागून ट्रॉलीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतरांना महात्मा गांधी आणि सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
REET परीक्षा 26 सप्टेंबर रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. यासाठी 16 लाख 22 हजार 19 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारने उमेदवारांसाठी मोफत बससेवा जाहीर केली आहे. दुसरीकडे, रेल्वेने यासाठी 11 विशेष गाड्या चालवण्याचे मान्य केले आहे. आणखी काही गाड्यांची विनंती करण्यात आली आहे. राज्यात 3993 परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App