नॅशनल हेराल्ड केस : राहुलजींनी ठेवला होता ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरांवर ठपका; सोनियाजींनी घेतले मोतीलाल व्होरांचे नाव!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ईडी चौकशी दरम्यान काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा यांच्यावर ठपका ठेवला होता, तर सोनिया गांधींनी ईडीच्या चौकशीत मोतीलाल व्होरा यांचे नाव घेतले आहे. नॅशनल हेराल्ड केस मध्ये हे दोघे जरी आरोपी असले तरी मुख्य आरोपी मात्र सोनिया आणि राहुल गांधी हेच आहेत. फर्नांडिस आणि व्होरा या दोन्ही नेत्यांचे आधीच निधन झाले आहे. Rahulji blamed Oscar Fernandes, Motilal Vora

नॅशनल हेराल्ड केसमध्ये बुधवारी तिसऱ्या दिवशी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. सोनियांची 21 जुलैला 3 तास आणि 26 जुलैला 6 तास चौकशी करण्यात आली. सोनियांच्या चौकशीवरून काँग्रेस आज पुन्हा देशभर सत्याग्रह करत आहे.

चौकशीदरम्यान सोनिया गांधी म्हणाल्या – काँग्रेस, असोसिएट जर्नल आणि यंग इंडियनशी संबंधित सर्व व्यवहार माजी कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पाहिले होते. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांच्या चौकशीत सोनिया गांधींना 75 प्रश्न विचारण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे 25 प्रश्न विचारण्यात आले, अशी बातमी द टाइम्स ऑफ इंडियाने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे



 

राहुलसह 50 खासदारांना ताब्यात घेतले

मंगळवारी राहुल गांधींसह काँग्रेसच्या 50 खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनियांची चौकशी संपल्यानंतर या खासदारांना सोडून देण्यात आले. संसदेजवळील विजय चौकात आंदोलनादरम्यान सर्व खासदारांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर राहुल यांनी टीका करत देशाला पोलिस राज्य बनवले असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे सर्व खासदार आणि अन्य नेते आज पुन्हा आंदोलन करत आहेत.

काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी राज्यसभेतील कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली. पण अध्यक्षांनी ती फेटाळली. गोहिल यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तपास यंत्रणा विरोधी पक्षांवर सूडाच्या भावनेने कारवाई करत आहे.

युवक काँग्रेस अध्यक्षाला पोलिसांची मारहाण

मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांना दिल्ली पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी केस ओढत मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे निवेदन जारी केले.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरण पहिल्यांदा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये समोर आणले होते. ऑगस्ट 2014 मध्ये, ईडीने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीज, सॅम पित्रोडा आणि सुमन दुबे यांना आरोपी करण्यात आले होते.

Rahulji blamed Oscar Fernandes, Motilal Vora

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात