विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत असल्याने लसीकरणासाठी आता लोकांना आत्मनिर्भर होण्याखेरीज पर्याय उरलेला नाही अशी बोचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.Rahul Gandi targets Govt.
याआधीही केंद्राच्या लसवितरण धोरणावरून राहुल गांधींनी सातत्याने टिका चालविली आहे. निष्पक्ष धोरणाचा अभाव असल्यामुळेच लसीचे योग्य वितरण होत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
ट्विटर कंपनीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर खात्यांवरील अधिकृतपणा दर्शविणारी ब्ल्यू टिक हटविली.
केंद्र सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून ट्विटरला नियमावली पालनासाठी पुन्हा एकदा आठवण करून दिली. नियम पाळा अन्यथा कारवाईला तयार राहा, असा अंतिम इशाराही दिला आहे.
या साऱ्या प्रकारावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम वेगळा आहे, अशी खिल्ली उडवली. मोदी सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत आहे. तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लस हवी असेल तर तुम्हाला आत्मनिर्भर बनावे लागेल, असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App