गौतम अदानी राहुलजींच्या टार्गेटवर, पण पवारांचे वारस रोहित अदानींच्या बचावात, पार्थ पवार कुठेत??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भले उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधींच्या टार्गेटवर असतील, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या विषयात काँग्रेसपासून बरेच अंतर राखून आहे, इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचे राजकीय वारस होऊ पाहणारे आमदार रोहित पवार हे देखील अदानींच्या बचावासाठी पुढे आले आहेत. rahul gandhi targeted gautam adani, but rohit pawar support adani, parth pawar kept mum

अदानीगेट या मुद्द्यावरून एकीकडे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई रंगली असताना दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीत वेगळा खेळ सुरू असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार अदानींच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत, तर राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपशी जवळीक साधू पाहणारे पार्थ पवार मात्र अदानी मुद्द्यापासून अद्याप तरी दूर आहेत. त्यांनी अदानी प्रकरणावर मत जाहीर केलेले नाही. अर्थात पार्थ पवारांनी अदानींच्या बाजूने उभे राहणे, ही भाजपची अजिबातच गरज नाही.



पण राम मंदिराच्या मुद्यावर भाजपला अनुकूल भूमिका घेणारे पार्थ पवार अदानी मुद्द्यावर अद्याप बोलले नसल्याने आणि अदानींच्या समर्थनासाठी रोहित पवार पुढे सरसावल्याने राष्ट्रवादीत पवारांचा खरा वारसा रोहितच असल्याच्या चर्चा जास्त रंगल्या आहेत.

अदानींच्या प्रगतीत मनमोहनसिंग सरकार, मोदी सरकार यांच्या सारखाच पवारांचाही वाटा राहिला आहेच. तोच वाटा ओळखून रोहित पवार अदानींच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. पण पार्थ अद्यापतरी पुढे आलेले नाहीत, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

रोहित पवार तसेही केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांची न मागता सल्लागारी करतच असतात. आता देखील गौतम अदानी यांनी न मागताच रोहित पवार त्यांच्याही मदतीला धावले आहेत. अदानीगेट ओपन करणाऱ्या हिंडेनबर्ग एलसीसी संस्थेवर रोहित पवारांनी गंभीर प्रश्नचिन्ह लावले आहे. मिसगाईड करणे हे हिंडेनबर्गचे काम आहे, असा आरोप करून रोहित पवारांनी अदानींची पाठराखण करताना हिंडेनबर्ग कंपनीवर ताशेरे झोडले आहेत.

हिंडेनबर्ग सारख्या कंपनीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असले उद्योग सुरू केले आहेत. त्यांचा धंदाच असा आहे. ते नेहमी उलटी पोझीशन घेतात. शेअर पडत गेले की त्यांना नफा जास्त होतो. अदानी सारख्या कंपनीचे शेअर्स पडले की ते खरेदी करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. या कंपनीने जे स्टेटमेंट काढले ते सिध्द करण्यासाठी वेळ जाणार आहे. त्यामुळे बाजार खाली आला. त्यामध्ये हिंडेनबर्ग कंपनीने मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला आहे. परंतु, सामान्य लोकांनी तसेच एलआयसी, एसबीआयने पैसा टाकला होता त्याला मोठ्या प्रमाणात अडचण आली आहे. ईडीच्या बाबत होते की पुरावे देण्यामध्येच वेळ जातो एखाद्या व्यक्तीने झिरोपासून सुरू करून कंपनी उभी केली असेल तर पुन्हा उभी करण्यासाठी वेळ जातो, अशा शब्दांत रोहित पवारांनी अदानींचा बचाव केला आहे.

राहुल गांधींनी ज्या वेगात आणि ज्या गांभीर्याने गौतम अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, तितक्याच वेगात आणि गांभीर्याने रोहित पवारांनी अदानींचा बचाव केला आहे.

कोणत्याही उद्योगाकडे मी एकाच दृष्टीने बघतो की त्यांची युवकांना रोजगार देण्याची क्षमता. देशात रोजगार देण्यामध्ये अदानी हे चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे अदानींनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीतून काढायला नको, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

गौतम अदानी यांनी काही महिन्यांपूर्वी बारामतीला पवारांच्या कार्यक्रमासाठी भेट दिली होती. यावेळी बारामती विमानतळापासून रोहित पवार यांनी स्वत: त्यांच्या गाडीचे सारथ्य केले होते.

या पार्श्वभूमीवर नातवाच्या रूपाने रोहित पवार हेच शरद पवारांचे राजकीय वारस आहेत, पार्थ पवार नव्हे, याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगली आहे.

rahul gandhi targeted gautam adani, but rohit pawar support adani, parth pawar kept mum

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात