राहुल गांधी पोहोचले राजभवनवर पण चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर; अमरिंदरसिंग गैरहजर


वृत्तसंस्था

चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी बरीच भवति न भवति झाल्यानंतर काँग्रेसचे नेते चरणजित सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज सकाळी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी पोहोचले जरूर, पण ते चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर…!! राहुल गांधी पोहोचेपर्यंत चन्नी यांचा शपथविधी उरकला होता. Rahul Gandhi reached Raj Bhavan but after Charanjit Singh Channy was sworn in as the Chief Minister; Amarinder Singh absent

राहुल गांधी यांनी नंतर भेटून चन्नी यांचे अभिनंदन केले. मूळात काल या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी येणार की नाही यावर बराच संभ्रम होता. सुरुवातीला बातमी आली की ते शपथविधीला जाणार नाहीत. नंतर बातमी आली ते शपथविधीला जाऊ शकतात. ते आज अखेरीस राजभवनवर पोहोचले, पण उशिरा. त्यामुळे राहुल गांधी यांनी पंजाबचा नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्याच्या बातमी ऐवजी त्यांच्या राजभवनावर उशिरा पोहोचण्याची बातमी झाली.



काँग्रेस श्रेष्ठींच्या नाराजीमुळे राजीनामा द्यावा लागलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे देखील नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर नव्हते. राहुल गांधी शपथविधीला हजर राहणार आहेत ही माहिती समजल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचे टाळले, असे समजते. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे आज दुपारी कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भेट घेणार असल्याची बातमी आहे.

Rahul Gandhi reached Raj Bhavan but after Charanjit Singh Channy was sworn in as the Chief Minister; Amarinder Singh absent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात