राहुल गांधींची केंद्राच्या नॅशनल मॉनिटायजेशन पाइपलाइनवर टीका; म्हणाले, 70 वर्षांत तयार झालेली मालमत्ता सरकारने विकायला काढली!

Rahul Gandhi Press Conference Attack Over Pm Narendra Modi Government Finance Policy And Bjp

Rahul Gandhi Press Conference : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 70 वर्षांत देशाने जे काही मिळवले ते विकण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. रेल्वे खासगी लोकांना विकली जात आहे. पंतप्रधान सर्व काही विकत आहेत. Rahul Gandhi Press Conference Attack Over Pm Narendra Modi Government Finance Policy And Bjp


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 70 वर्षांत देशाने जे काही मिळवले ते विकण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. रेल्वे खासगी लोकांना विकली जात आहे. पंतप्रधान सर्व काही विकत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपचा नारा होता की ’70 वर्षांत काहीही झाले नाही’ आणि काल अर्थमंत्र्यांनी 70 वर्षांत या देशाने जे काही कमावले होते ते विकण्याचा निर्णय घेतला आहे, याचा अर्थ पंतप्रधानांनी सर्व काही विकले आहे.

राहुल गांधीची केंद्रावर टीका

राहुल गांधी म्हणाले की, एकाधिकार निर्माण करण्यासाठी सर्व खासगीकरण केले जात आहे. पॉवर, टेलिकॉम, वेअरहाऊसिंग, खाणकाम, विमानतळ, बंदरे हे सर्व एकाधिकार निर्माण करण्यासाठी केले जात आहे. बंदर कोणाच्या हातात आहेत, विमानतळ कोणाला मिळतात हे तुम्हाला माहिती आहे.

राहुल गांधी म्हणाले की, एकाधिकार निर्माण होताच तुम्हाला रोजगार मिळणे बंद होईल. या देशातील छोटे आणि मध्यम व्यवसाय जे तुम्हाला उद्या रोजगार देतील ते सर्व बंद होतील आणि संपतील. 3-4 व्यवसाय असतील, त्यांना रोजगार देण्याची गरज भासणार नाही.

ते म्हणाले की, मोदी सरकार हिंदुस्तानची मिळकत विकत आहे, हा तुमच्या भविष्यावर हल्ला आहे. नरेंद्र मोदीजी आपल्या दोन-तीन उद्योगपती मित्रांसह भारतातील तरुणांवर हल्ला करत आहेत, हे तुम्ही समजून घ्या.

स्मृती इराणींचा पलटवार

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ज्यांनी देशाची मालमत्ता विकली ते आज आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांनी आज त्यांची दुटप्पीपणा दाखवला आहे. इराणी म्हणाल्या, “2008 मध्ये, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना नवी दिल्ली रेल्वे स्थानकासंदर्भात आरएफपीची घोषणा करण्यात आली होती. मग राहुल गांधींचा असा आरोप आहे का, की ज्या सरकारचे नेतृत्च त्यांच्या आईचे होते त्या सरकारने देश विकण्याचा प्रयत्न केला?

Rahul Gandhi Press Conference Attack Over Pm Narendra Modi Government Finance Policy And Bjp

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात