वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संपला. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक चित्र शेअर करून मोदी सरकारला टोला हाणला आहे.Rahul Gandhi petrol: Voters fill petrol tanks; Rahul Gandhi lashes out at Modi government over price hike
मतदारांनो, आपल्या गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फुल्ल करून घ्या!! मोदी सरकारची “इलेक्शन ऑफर” आता समाप्त होत आहे, असे ट्विट राहुल गांधींनी एका चित्रासह केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फुल्ल करून घ्या. नंतर पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ होणार आहे, असेच राहुल गांधी यांनी या ट्विट मधून सूचित केले आहे.
फटाफट Petrol टैंक फुल करवा लीजिए। मोदी सरकार का ‘चुनावी’ offer ख़त्म होने जा रहा है। pic.twitter.com/Y8oiFvCJTU — Rahul Gandhi (@RahulGandhi) March 5, 2022
फटाफट Petrol टैंक फुल करवा लीजिए।
मोदी सरकार का ‘चुनावी’ offer ख़त्म होने जा रहा है। pic.twitter.com/Y8oiFvCJTU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 5, 2022
रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वच देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर भडकले आहेत. मात्र, भारतामध्ये अद्याप त्याचे तितकेसे परिणाम दिसलेले नाहीत. उत्तर प्रदेश मधला निवडणुकीचा मतदानाचा शेवटचा टप्पा झाला की 7 मार्च नंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टोला हाणून घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App