विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा काँग्रेसवरच उलटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राहुल गांधी आता सावरकर मुद्द्यावर बोलण्याचे टाळतील अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. त्यातच शरद पवारांनी सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. या मुद्द्यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आहेत त्यावर चर्चा करू अशी भूमिका कालच्या 18 पक्षांच्या बैठकीत मांडल्याची बातमी आहे. Rahul Gandhi (news) in a fix over savarkar insult issue, compelled not to talk on savarkar
एकीकडून शिवसेना-भाजप यांची आक्रमक भूमिका आणि त्यातच उद्धव ठाकरेंची भर आणि पवारांची मध्यस्थी यामुळे निर्माण झालेला दबाव राहुल गांधींच्या लक्षात आल्याने त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळण्याचे ठरवले आहे, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. त्यामुळे या सूत्रांची सत्यता किती आणि बातम्यानुसारच राहुल गांधी भविष्यकाळात वागतील याची खात्री कोण घेणार??, हा खरा प्रश्न आहे.
राहुल गांधींची गॅरंटी कोण घेणार??
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर काळ ठाकरे गटाने बहिष्कार घातला. आज त्याची पुनरावृत्ती देखील केली. स्वतः संजय राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली. मल्लिकार्जुन खर्गे हे या संदर्भात राहुल गांधींची स्वतः बोलणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत निर्माण झालेली बिघाडी याचे राजकीय गांभीर्य राहुल गांधींच्या लक्षात आले आणि इथून पुढे ते सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती असल्याच्या मराठी माध्यमांच्या या बातम्या आहेत.
परंतु ही सूत्रे नेमकी कोणती आणि राहुल गांधी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर कबूल झालेत??, याचे तपशील या बातम्यांमध्ये नाहीत. त्यामुळे त्या बातम्यांना आधार मानून राहुल गांधी हे भविष्यकाळात तसेच वागतील आणि सावरकरांच्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळतील, याची गॅरंटी कोण घेणार??, हा खरा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App