प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात लोकशाही नाही, भारतात अल्पसंख्यांक धोक्यात आहे वगैरे भाषणे करत अमेरिका आणि इंग्लंड दौरा करणारे राहुल गांधी प्रत्यक्षात भारताला बदनाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टूलकिटचा केवळ एक मोहरा आहेत, अशा आशयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.Rahul Gandhi is just one pawn in the international toolkit to defame India
राहुल गांधींनी आपल्या अमेरिका आणि इंग्लंड दौऱ्यात ठिकठिकाणी केलेल्या भाषणांमधून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली पण त्या पलीकडे जाऊन भारतालाच युरोपियन युनियन सारखे “स्टेट्स ऑफ द युनियन” म्हटले. भारताच्या सार्वभौम एकतेला त्यांनी आव्हान दिले. भारताची राज्यघटना जे सांगत नाही ते परदेशात जाऊन सांगितले.
RaGa….just a pawn! pic.twitter.com/SYxyrDFTi7 — BJP (@BJP4India) June 18, 2023
RaGa….just a pawn! pic.twitter.com/SYxyrDFTi7
— BJP (@BJP4India) June 18, 2023
त्यामुळे भाजपने राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ जारी केला आहे त्याचे नावच मुळी त्यांनी “मोहरा” असे ठेवले आहे. भारताची ग्रोथ स्टोरी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लिबरल मीडियाला सहन होत नाही. त्यामुळे भारतातल्याच विरोधी पक्षांना हाताशी धरून त्यांनी बदनामीचे टूलकिट तयार केले आहे आणि या टूलकिटचा राहुल गांधी एक मोहरा बनले आहेत, असे टीकास्त्र भाजपने या व्हिडिओ मधून सोडले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून त्यामध्ये राहुल गांधींनी अमेरिका आणि इंग्लंड मध्ये केलेली भाषणे, त्यांचा आशय याची प्रचंड खिल्ली उडवली आहे. त्याला सोशल मीडियात जोरदार प्रतिसादही मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App