Rahul Gandhi : लोकसभेत राहुल गांधींचा फ्लाईंग किस; अभद्र वर्तनाबद्दल महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावावर लोकसभेत भाषण केल्यानंतर राहुल गांधींनी स्मृती इराणी यांच्याकडे पाहत फ्लाईंग किस दिला, असा गंभीर आरोप सदनातील महिला खासदारांनी केला आहे. यासंदर्भात स्वतः स्मृती इराणी यांनी सदनात उभे राहून सुद्धा उपस्थित केलाच, पण त्याचबरोबर शोभा करंदलजे, हेमामालिनी यांच्यासह 18 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधींच्या अभद्र वर्तनाबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारी तक्रार दाखल केली. Rahul Gandhi gave flying kiss while leaving loksabha, 18 women mps complained to loksabha speaker

बुधवारी लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या भाषणानंतर नवा वाद निर्माण झाला. स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘मला एका गोष्टीवर माझा आक्षेप नोंदवायचा आहे. सदनात ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी भाषण करून सदनाबाहेर निघताना अशोभनीय वर्तन केले.

त्या म्हणाल्या की, ही असभ्य व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकते. या देशाच्या सभागृहात असे अनादराचे आचरण कधीच पाहिले नाही. ही त्या कुटुंबाची लक्षणे आहेत, हे आज देशाला कळले.

खरे तर आज सर्वात आधी लोकसभेत राहुल गांधी बोलले. त्यांनी मणिपूरमध्ये ‘भारत माते’ची हत्या झाल्याचे म्हटले, ज्यावर सत्ताधारी पक्षाने तीव्र निषेध केला. तेव्हा स्मृती बोलायला उभ्या राहिल्या. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी फ्लाईंग किसचाही उल्लेख केला.

राहुल गांधींबाबत अध्यक्षांकडे तक्रार

भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी राहुल गांधींच्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रार अर्जावर हेमामालिनी यांच्यासह लोकसभेतल्या 18 महिला खासदारांच्या सह्या आहेत.

Rahul Gandhi gave flying kiss while leaving loksabha, 18 women mps complained to loksabha speaker

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात