नाशिक : “काशीवाले विश्वनाथने हिंदू फटकारा है, कहो गर्व से हम हिंदू है, हिन्दुस्तान हमारा है।”… काशीवाल्या विश्वनाथाची खरोखरच अशी काही जबरदस्त फटकार लागली आहे, की त्याची प्रचिती आज उत्तराखंडची राजधानी डेहराडून मध्ये पुन्हा एकदा आली आहे…!!Rahul Gandhi deharadun rally starts with vedic swasti mantra enchanting
होय, मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही, असे जाहीरपणे जयपूरच्या सभेत सांगणाऱ्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या हिंदूकरणाचा पुढचा टप्पा गाठला आहे. राहुल गांधी यांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यात डेहराडूनच्या विजय संकल्प मेळाव्यात जाहीरपणे वैदिक स्वस्तिमंत्राचे पठण झाले आहे…!!
एवढेच नाही तर शंख फुंकून राहुल गांधींचे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले आहे. उत्तराखंडचे ब्राह्मण व्यासपीठावर स्वस्तिमंत्राचे पठण करत असताना सर्व नेते नमस्कार मुद्रेत उभे होते. यानंतर राहुल गांधी यांना सर्व ब्राह्मणांनी यशस्वी होण्याचे आशीर्वचनही दिले.
राहुल गांधी यांचा हिंदूकरणाचा हा पुढचा टप्पा आहे. स्वतः राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून स्वस्तिमंत्र पठणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “यह धर्म का मार्ग है। न्याय का मार्ग है।” असे त्यांनी त्यावर नमूद केले आहे.
धर्म का पथ न्याय का पथ है। इस पथ पर हम सब साथ हैं।#विजय_सम्मान_रैली pic.twitter.com/vkpuXG1I2S — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2021
धर्म का पथ न्याय का पथ है।
इस पथ पर हम सब साथ हैं।#विजय_सम्मान_रैली pic.twitter.com/vkpuXG1I2S
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2021
कुठल्याही काँग्रेस नेत्याची जाहीर सभा अशा पद्धतीने स्वस्ति मंत्र पठाणाने होण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. आत्तापर्यंत काँग्रेसचे नेते सर्वधर्मसमभावाचे उदाहरण घालून देण्यासाठी आपापल्या सभांमध्ये क्वचित प्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करत असत. उत्तराखंडच्या विजय संकल्प मिळाव्यात राहुल गांधी यांनी वैदिक स्वस्तिमंत्र पठाणाने सुरुवात करून आपल्या काँग्रेस पक्षाच्या हिंदूकरणाचा नवा पायंडा पाडला आहे.
उत्तराखंडमध्ये 20 ते 25 % ब्राह्मण मते असल्याचे मानले जाते. ब्राह्मण समाजाचा विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देवस्थान मॅनेजमेंट कायदा मागे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या या राजकीय खेळीकडे बघितले जात आहे. म्हणूनच आपल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार त्यांनी व्यासपीठावर वैदिक स्वस्तिमंत्र पठण करून, शंखनाद करून सभेची सुरुवात केली आहे.
या वैदिक स्वस्ति मंत्रामध्ये इंद्र, वरूण अशा वैदिक देवतांची प्रार्थना करण्यात आली आहे. शत्रूचा नाश होवो. आमच्याकडून चांगली प्रार्थना होवो. आमच्या हातून चांगले कार्य होवो अशी कामना यात करण्यात आली आहे…!! अर्थात हा स्वस्ति मंत्र नवीन नाही पण काँग्रेसच्या सभेत त्याचे पठण नवीन आहे. काशीवाल्या विश्वनाथाची अशी काही जबरदस्त फटकार लागली आहे की त्याने भलेभले सरळ होऊन स्वस्ति मंत्र पठाणाकडे वळल्याचे दिसत आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App