सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे करणार चर्चा; नाना पटोलेंची माहिती

प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत, हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. पण वीर सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिली. Rahul Gandhi and Uddhav Thackeray will discuss the issue of Savarkar

पटोले म्हणाले की, देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सध्या देश, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपाविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत आहोत.

सावरकरांबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. परंतु वीर सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत, असेही पटोले म्हणाले.

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will discuss the issue of Savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात