विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सावरकरांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या राहुल गांधींनी किमान त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे म्हणणे तरी मानावे आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगावेत. कारण आता इंदिरा गांधी यांनीच सावरकर यांचा भारताचे प्रतिष्ठित पुत्र म्हणून गौरव केल्याचे पत्र समोर आले आहे.Rahul Baba, your grandmother, Indira Gandhi had glorified Savarkar as the distinguished son of India
इंदिरा गांधींनी १९८० मध्ये सावरकरांचा गौरव केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर नॅशनल मेमोरियल सोसायटीचे सचिव पंडित बखले यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधींनी सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या योजना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच वेळी, त्यांनी सावरकरांचे फक्त भारताचे प्रतिष्ठीत पुत्र म्हणून वर्णन केले नाही तर ब्रिटिश सरकारशी त्यांच्या निर्भय संघर्षाचे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात स्वतःचे महत्त्वाचे स्थान आहे, असेही म्हटले होते.
सावरकरांवर ‘द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्वा’ हे पुस्तक लिहिणारे लेखक वैभव पुरंदरे यांनीही काही वर्षांपूर्वी या पत्राच्या विश्वासार्हतेची पुष्टी केली होती. २०१९ मध्ये, दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या ‘भारत बचाओ रॅली’मध्ये राहुल गांधींनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. मी मरेन पण सत्यासाठी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
राहुल गांधी यांची सावरकरांबाबतची भूमिका माहित असल्याने काँग्रेसचे अनेक नेते संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यावर टीका करू लागले आहेत. सावरकरांविरोधात खोटे बोलले गेले. त्यांनी वारंवार ब्रिटिशांची माफी मागितली असे सांगितले गेले, पण सत्य हे आहे की त्यांनी स्वतःला क्षमा करण्यासाठी दया याचिका दिली नाही.
महात्मा गांधींनी त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी ही याचिका दिली होती. महात्मा गांधींनी सावरकरांना सोडून द्यावे असे आवाहन केले होते. पण त्यांना बदनाम करण्यासाठी, त्यांनी माफी मागितली असे सांगितले जाते, जे पूर्णपणे निराधार आहे,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते.
काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला होता. सावरकर तुरुंगात असताना त्यांनी महात्मा गांधींशी संवाद कसा साधला?, असे ते म्हणाले होते.
असेच शाब्दीक युद्ध दोन वर्षांपूर्वी काँग्रेस-भाजपामध्ये सावरकरांवर रंगले होते, त्यावेळी भाजपा नेते जितेंद्र सिंह यांनी इंदिरा गांधींचे एक जुने पत्र ट्विट केले होते. ज्यात इंदिरा गांधींनी सावरकरांची स्तुती केली होती. तसेच २०२० मध्ये भाजपाचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील हे पत्र ट्वीट करत काँग्रेसवर निशाणा साधला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App