Punjab Congress Crisis : बंड कायम! आता सिद्धूंचे समर्थन करणाऱ्या 40 आमदारांनी सोनियांना लिहिले पत्र


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील गोंधळ थांबलेला नाही. सूत्रांच्या हवाल्याने पंजाबमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी झाल्याची बातमी आहे. सिद्धू गटाचे मंत्री आणि आमदार पुन्हा एकदा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात एकत्र येत असल्याचे बोलले जात आहे.Punjab Congress Crisis Tript Rajinder Singh Bajwa and other Rebel MLAs letter to Sonia Gandhi

सिद्धू यांचे निकटवर्तीय आणि कॅप्टनचे कट्टर विरोधक कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्रसिंह बाजवा यांनी सोनिया गांधींना 40 आमदारांचे स्वाक्षरी केलेले पत्र पाठवले आहे. तृप्त राजेंद्रसिंह बाजवा हे एकेकाळी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे जवळचे मानले जात होते.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू गटातील असंतुष्ट आमदारांनी पत्र पाठवण्यापूर्वी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस परगट सिंह यांच्या घरी प्रथम विचारमंथन केले आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा सगळे कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्रसिंह बाजवा यांच्या घरी जमले. या सर्वांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

पत्रात सिद्धू गटाच्या सुमारे 40 आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरात लवकर बोलावण्याची मागणी केली आहे. यासोबतच, हायकमांडच्या वतीने दोन केंद्रीय निरीक्षकदेखील या बैठकीला पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या असंतुष्ट आमदारांनी कॅप्टनविरोधात या पत्रात उघडपणे आपला राग व्यक्त केला आहे.

बंडखोर आमदारांनी हायकमांडला सांगितले की, कॅप्टनने विरोधी आमदारांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची बदली केली आहे. आमदारांची कामे होत नाहीत. पत्रात आरोप करण्यात आला आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या गटातील अधिकाऱ्यांचे आमदारांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यामुळे सिद्धू गट चांगलाच संतापला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पत्रात म्हटले आहे की, आमदार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर असमाधानी आहेत आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरात लवकर बोलावण्यात यावी.

Punjab Congress Crisis Tript Rajinder Singh Bajwa and other Rebel MLAs letter to Sonia Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात