पंजाबसाठी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे मागितल्या सुरक्षा दलाच्या 25 जादा कंपन्या आणि “बरेच काही…!!”

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केली आणि त्यानंतर ते पोहोचले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीला.Punjab CM Capt Amarinder Singh urges Union HM Amit Shah to intervene to resolve farmers protest & repeal Farm Laws to prevent inimical forces from exploiting their anger.

कॅप्टन साहेबांची ही भेट सोनिया भेटीपेक्षा अधिक गाजते आहे. वास्तविक ही भेट पूर्वनियोजित होती. परंतु, सोनिया गांधी यांना भेटल्यानंतर ते अमित शहा यांच्याकडे पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.



अमित शहा यांच्या घरी जाऊन कॅप्टन साहेब यांनी त्यांची भेट घेतली. पंजाबमधल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी सुरक्षा दलांच्या ज्यादा 25 कंपन्या पंजाबला देण्यात याव्यात, अशी मागणी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे केल्याचे त्यांच्या मीडिया सल्लागाराने सांगितले.

परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची चर्चा कॅप्टन साहेब आणि अमित शहा यांच्यात झाल्याचे समजते. शेतकरी आंदोलन तसेच केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे हा चर्चेचा मुख्य विषय होता. कृषी कायद्यांविरोधात वातावरण पेटवण्यासाठी पंजाबमधल्या काही विशिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे कॅप्टन साहेबांनी अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. अमित शहा यांनी “मध्यस्थी” करून कृषी कायद्यासंदर्भातील तिढा सोडवावा, अशी विनंती कॅप्टन साहेबांनी केली आहे.

इथेच वेगळे राजकारण मुरत असल्याचे लक्षात बोलले जात आहे काँग्रेस एकीकडे संसदेत कृषी कायद्यासंदर्भात गेले दोन आठवडे अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन संसद बंद पाडते आहे. त्यात पेगासस असाही मुद्दा आहे. परंतु कॅप्टन साहेब मात्र अमित शहांना “मध्यस्थीची विनंती” करत आहेत, यातले नेमके राजकीय गौडबंगाल काय?, याविषयी राजकीय वर्तुळात
चर्चा सुरू झाली आहे.

शिवाय सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कॅप्टन साहेब हे अमित शहांच्या घरी पोहोचले. या “राजकीय टाइमिंग” विषयी देखील अनेक राजकीय निरीक्षकांनी शंका व्यक्त केली आहे. यातूनच कॅप्टन साहेब आणि भाजप हे राजकीयदृष्ट्या जवळ येत आहेत का?, अशी चर्चा राजधानीत सुरू झाली आहे. शरद पवारांनी अमित शहा यांची भेट संसदेतल्या कार्यालयात घेतली. मात्र, कॅप्टन साहेबांना अमित शहा हे स्वतःच्या घरी भेटले. या राजकीय संकेतांमधील  फरकाकडेही राजकीय निरीक्षकांनी लक्ष वेधले आहे.

Punjab CM Capt Amarinder Singh urges Union HM Amit Shah to intervene to resolve farmers protest & repeal Farm Laws to prevent inimical forces from exploiting their anger.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात