वृत्तसंस्था
नवी दिल्ली: औषधांच्या विक्रीला चालना देण्यासाठी डॉक्टरांना फार्मा स्युटिकल कंपन्यांकडून भेटवस्तू किंवा प्रलोभने देणे कायद्याने प्रतिबंधित आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यामुळे आयकर कायद्यांतर्गत कपातीची मागणी करणाऱ्या एका फर्मची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. Promoting drug business by tempting doctors Companies will not get income tax relief; Supreme Court
डॉक्टरांना प्रलोभने देऊन औषधाचा खप वाढविणाऱ्या कंपन्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला आहे. औषधांचा खप वाढवा म्हणून कंपन्या डॉक्टरांना किंमती वस्तू जशी सोन्याची नाणी, फ्रिज आणि एलसीडी टीव्ही यांसारख्या भेटवस्तू देतात. तसेच ते सुट्टीतील किंवा आंतरराष्ट्रीय सहलींसाठी निधी देखील पुरवत असल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये हेराफेरी करण्यासारखा असून चिंताजनक आहे, अशा शब्दात औषध कंपन्यांचे कान सर्वोच्च न्यायालयाने उपटले आहेत.
न्यायमूर्ती यू.यू .ललित आणि एस.रवींद्र भट यांच्या खंडपीठाने मेसर्स एपेक्स लॅबोरेटरीज प्रा. लि.चे अपील फेटाळून लावले. डॉक्टरांना मोफत वस्तूसाठी कंपनी खर्च करत असल्याने कर कपातीचा लाभ मिळावा, अशी मागणी कंपनीने केली होती. ती फेटाळली होती.
दरम्यान, डॉक्टरांना भेटवस्तू देत असल्याने आयकारात कपात लाभासाठी औषध कंपन्या पात्र नाहीत, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात कंपनीने अपील केले होते. ते न्यायालयाने फेटाळले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App