Project Cheetah : चिते की चाल, 70 वर्षांनंतर भारतात पाहाल!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अतिशिकार आणि नंतर झालेले दुर्लक्ष यामुळे भारतातून नामशेष झालेले दिमाखदार चित्ते भारतात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत, ते सुद्धा प्राणी संग्रहालयातील बंद पिंजऱ्यांमध्ये नव्हे, तर खुल्या आसमानाखाली घनदाट जंगलात!!Project Cheetah : Cheetah ki Chal, will be seen in India after 70 years!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदाचा वाढदिवस म्हणजेच 17 सप्टेंबर हा दिवस देशासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण, देशात या खास पाहुण्यांचं आगमन होत आहे, तेसुद्धा तब्बल 70 वर्षांनंतर. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा एकदा देशात आल्यामुळे सध्या सर्व प्राणीप्रेमींमध्ये कमालीचे कुतूहल पाहायला मिळत आहे.



नामिबियातून भारतात 8 चित्ते आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तो अमलातही आणला आहे. या चित्त्यांची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही दृश्य पाहता येत आहेत. यामध्ये चित्ते आपल्याकडे नजर रोखून पाहताना दिसत आहे. चित्त्यांची ही झलक पाहताना आणि त्यांची चपळ आणि बळकट पावलं पाहता, ‘चिते की चाल…’ हा डायलॉग त्यांना फिट्ट बसतो!!

चित्त्यांसाठी खास विमान

चित्त्यांना आणण्यासाठी खास बोईंग विमानाची सोय करण्यात आली. मुख्य म्हणजे चित्त्यांसाठी या विमानात खास बदलही करण्यात आले. नामिबीयाहून आलेले हे पाहुणे यापुढे मध्य प्रदेशातील कुनो – पालपूर राष्ट्रीय उद्यानात जातील. तोच त्यांचा कायमचा अधिनिवास असणे अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हे भारताला हे अनोखे गिफ्ट ठरणार आहे.

Project Cheetah : Cheetah ki Chal, will be seen in India after 70 years!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात