विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील पराभवासाठी प्रियंका गांधीच जबाबदार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेतला त्याप्रमाणे प्रियंका गांधी यांनाही जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी कॉँग्रेसचे नेते झिशान हैदर यांनी केला आहे.Priyanka Gandhi is responsible for Uttar Pradesh’s defeat, Congress leader demands resignation
झिशान हैदर यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. झिशान यांनी म्हटले आहे की, याआधीही जेव्हा-जेव्हा राज्यात निवडणुकीचे निकाल वाईट आले, तेव्हा उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रभारी दोघांनीही राजीनामा दिला आहे.
अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिला आहे, आता प्रियंका गांधी वड्रा यांनीही राजीनामा द्यावा. प्रियंका गांधी वढेरा यांच्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत आहे. आता त्यांनी राजीनामा द्यावा. पक्षाने प्रियंका गांधी यांच्याकडून सरचिटणीसपद काढून घ्यावे आणि त्यांना मुक्त करावे. पराभावाचे संपूर्ण खापर प्रदेशाध्यक्षांवर फोडणे चुकीचे आहे.
कारण राज्यातील सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहित आहे की प्रभारी जर स्वत: प्रियांका असतील तर प्रदेशाध्यक्ष स्वत:च्या मर्जीने साध्या शिपायाची देखील नेमणूक करु शकत नाहीत. जोपर्यंत प्रियांका गांधी आहेत, तोपर्यंत त्यांचा पराभव करणारे सेवक त्यांच्यासोबत राहतील आणि तीच टीम राहील.
प्रियांका गांधी यांच्या टीममुळेच उत्तर प्रदेशात ३८७ मतदार संघामधील आमची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेस पक्ष सर्वांचा आहे, असे म्हणतात, त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जितका तुमचा आहे तितकाच आम्हा सर्वांचा आहे. पक्षाच्या भल्यासाठी एखादे पाऊल उचलायचे असेल तर ते उचलण्यास मागेपुढे पाहता कामा नये.
यापूर्वी काँग्रेसने झिशान हैदर यांच्यावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कारवाई केली होती. ११ मार्च रोजी काँग्रेसने झिशान हैदर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App