मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून आढावा घेणार आहेत. ही बैठक दुपारी साडेचारच्या सुमारास होणार आहे.Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Ministers of all the states today, Chief Minister Uddhav Thackeray will be absent; What is the reason?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून आढावा घेणार आहेत. ही बैठक दुपारी साडेचारच्या सुमारास होणार आहे.
मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत.त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री का उपस्थित राहणार नाहीत? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बरेच दिवस घरातून बाहेर पडलेले नाहीत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App