
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध क्षेत्रातील स्टार्ट अपशी संवाद साधून त्यांची उमेद वाढविणार आहेत. आझादी का अमृत महोत्सवाच्या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात इनोव्हेशन इकोसिस्टम साजरे करण्यात येत आहे. 15 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून स्टार्ट अपचे सादरीकरणही होणार आहे.Prime Minister Narendra Modi will increase the hopes of start-ups through dialogue, innovation ecosystem program on the occasion of Independence Day
कृषी, आरोग्य, एंटरप्राइझ सिस्टम, अंतराळ, उद्योग , सुरक्षा, फिनटेक आणि पर्यावरण यासह विविध क्षेत्रातील स्टार्टअप सुरू करणाºयांना पंतप्रधान भेटणार आहेत. 150 हून अधिक स्टार्टअप्सना थीमनुसार सहा गटांत विभागले आहे.
स्थानिक ते जागतिक; भविष्यातील तंत्रज्ञान; मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बिल्डिंग चॅम्पियन्स आणि शाश्वत विकास हा मुळ उद्देश आहे. प्रत्येक गट पंतप्रधानांसमोर सादरीकरण करेल. स्टार्टअप्स देशाच्या गरजांमध्ये यशस्वीपणे कसे योगदान देऊ शकतात हे पंतप्रधान समजून घेणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्याच्या स्टार्टअप्स क्षमतेवर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास आहे. देशातील स्टार्टअप इकोसिस्टमवर प्रचंड प्रभाव पडला आह. देशात युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे.
जून 2021 मध्ये, सरकारने जाहीर केले की स्टार्टअप इंडिया फ्लॅगशिप अंतर्गत 50,000 हून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आह. त्यातून 5.5 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
भारतातील नवकल्पना आणि उद्योजकतेसाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाने सुरू स्टार्ट अप इंडिया हा कार्यक्रम सुरू केला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो.
Prime Minister Narendra Modi will increase the hopes of start-ups through dialogue, innovation ecosystem program on the occasion of Independence Day
महत्त्वाच्या बातम्या
- लोकसभेचे आठवे अधिवेशन 31 जानेवारी पासून
- महसूली न्यायालयाने प्रथमच दिला संस्कृतमध्ये निर्णय,झाशीच्या न्यायालयात दोन खटल्यांवर निर्णय
- श्रीराम मंदिराचे बांधकाम हजार वर्षे अबाधित राहणार ,फेब्रुवारी पासून मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात
- भाजप नेत्यांचे मौन सुटले : समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल
Array