जागतिक नेत्यांच्या लोकप्रियता रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच अव्वल!!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अव्वल राहिले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये इतर जागतिक नेत्यांची लोकप्रियता काहीशी डमळलेली असताना पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता मात्र टिकून आहे. अमेरिकेतील संस्था मॉर्निंग कन्सल्टंटने केलेल्या लोकप्रियता चाचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 % गुण मिळवून अव्वल स्थानी राहिले आहेत.Prime Minister Narendra Modi tops the popularity rating of world leaders

त्यांच्या खालोखाल मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रोडॉर 66%, इटलीचे पंतप्रधान मारिओ दाघ्री 58%, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल 54%, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन 47% हे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 44 % गुण मिळवून सातव्या स्थानावर आहेत.मॉर्निंग कन्सल्टंटने गेल्या दोन महिन्यात ऑनलाइन सर्व्हे घेतला. त्यामध्ये 2126 भारतीयांचा सविस्तर सर्व्हे घेण्यात आला. सर्व वयोगटांच्या घेतलेल्या सर्व्हेनुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता 70 टक्क्यांवर आहे. त्यांच्या खालोखाल इतर नेते लोकप्रियतेत पुढे आहेत.

परंतु, त्यांचे रेटिंग गेल्या वेळच्या रेटिंग पेक्षा चार ते पाच टक्क्यांनी कमी झालेले आढळले आहे. यात पश्चिम युरोप मधील ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगल यांच्या पंतप्रधानांची लोकप्रियता कमी झालेली आढळली आहे.

भारतात दसरा ते दिवाळी या कालावधीत महागाईचा मुद्दा महत्त्वाचा होता. पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी ओलांडून गेले होते. घरगुती गॅसच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अर्थात या घटकांचा मोदींच्या लोकप्रियतेवर मॉर्निंग कन्सल्टंट या सर्व्हेमध्ये फारसा परिणाम झालेला दिसलेला नाही.

Prime Minister Narendra Modi tops the popularity rating of world leaders

महत्त्वाच्या बातम्या