वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लखनौला पोचणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते आज लखनौ दौऱ्यावर आहेत. Prime Minister Narendra Modi in Lucknow today For the funeral of Kalyan Singh
कल्याणसिंह यांचे काल रात्री निधन झाले होते. त्यांचे प्रदीर्घ आजाराने ८९ व्या वर्षी रुग्णायात निधन झाले. या दरम्यान, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या प्रकृतीची दररोज आस्थेने विचारपूस करत होते. कल्याणसिंह यांनी राममंदिराच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनामुळे उत्तरप्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी हे लखनौ येथील मॉल अव्हेन्यू या निवासस्थानी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेणार आहेत.
कल्याणसिंह त्यांचे पार्थिव लखनौ येथील विधानभवनात सकाळी ११ वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर भाजप मुख्यालयात ते ठेवले जाणार आहे.
त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी त्यांच्या गावी म्हणजेच नरोला येथे गंगेच्या काठी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अलिगढ येथील स्टेडियम आणि कर्मभूमी अतरौली येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App