केंद्रीय तपास यंत्रणांना असहकार्य; पंतप्रधान मोदींनी राज्यांना करून दिली कर्तव्याची जाणीव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली / सुरजकुंड : गेल्या काही वर्षात देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विविध कायद्यांमध्ये सुधारणा करत कठोरता आणली आहे. तपास यंत्रणांच्या कामकाजात देखील वेग आणून सुधारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या तपास यंत्रणांना एकमेकांबरोबर सहकार्य करून गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे शक्य झाले आहे. Prime Minister Modi made the states aware of their duty

अर्थात यासाठी सर्व राज्यांनी आपापली कर्तव्य निभावून केंद्रीय आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने हरियाणातील सुरज कुंड येथे आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणांना अनेक राज्यांमध्ये तपास कामासाठी परवानगीची गरज लागू लागली आहे.

अनेक राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये राजकीय पक्षांच्या स्थानिक राजकारणाचा मोठा संदर्भ आहे. तसेच राजकीय नेत्यांचे एकमेकांशी असलेले विरोधाचे मुद्दे देखील समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्या सहकार्यावर आणि राज्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यावर भर दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले :

  • अनेक वेळा केंद्रीय तपास यंत्रणांना अनेक राज्यांमध्ये एकत्र तपास करावा लागतो अनेकदा दुसऱ्या देशांमध्येही जावे लागते त्यामुळे देशातल्या प्रत्येक राज्याचे हे कर्तव्य आहे की त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्यात समन्वय राखावा आणि एकमेकांना पूर्ण सहयोग करून द्यावा.
  • देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम हे 365 दिवस आणि 24 तास असे आहे ही एक निरंतर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत आधुनिकीकरण आणून गुन्ह्यांचा तपास वेगवान करणे हे आपले काम आहे गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने विद्यमान कायदे बदलून अथवा काही कायद्यांमध्ये सुधारणा करून देशातला दहशतवाद, हवाला नेटवर्क भ्रष्टाचार या विरोधात कठोर कारवाई केली आहे त्यामुळे तपास यंत्रणांवरचा जनतेचा विश्वास वाढला आहे देशात काही चुकीचे घडले तर त्यावर कारवाई होते हा विश्वास जनतेमध्ये तयार होणे ही बाब फार महत्त्वाची आहे.
  • केंद्राच्या आणि राज्याच्या तपास यंत्रणांनी तपास कामात आधुनिकीकरण आणून स्मार्ट टेक्नॉलॉजी चा वापर करून सायबर क्राईम ड्रग्स तस्करी रोखण्यामध्ये मोठे कामगिरी बजावली आहे.
  • कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्व तपास यंत्रणांनी वाढवला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करते आहे राज्य सरकारांनी सहकार्याचा आपला वाटा उचलला पाहिजे.

Prime Minister Modi made the states aware of their duty

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात