देशात राष्ट्रपतींना नाही तर शिक्षकांना सर्वाधिक वेतन मिळते असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. पण त्यापैकी पावणे तीन लाख रुपये हे टॅक्स कापला जातो. मग सांगा उरले किती रुपये? जितके उरले त्याहून कितीतरी अधिक वेतन अधिकारी आणि इतरांना मिळते. इथे शिक्षकही आहेत. त्यांना तर सर्वाधिक वेतन मिळते.President Ramnath Kovind said teachers pay more than the President
विशेष प्रतिनिधी
कानपूर: देशात राष्ट्रपतींना नाही तर शिक्षकांना सर्वाधिक वेतन मिळते असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. पण त्यापैकी पावणे तीन लाख रुपये हे टॅक्स कापला जातो. मग सांगा उरले किती रुपये? जितके उरले त्याहून कितीतरी अधिक वेतन अधिकारी आणि इतरांना मिळते. इथे शिक्षकही आहेत. त्यांना तर सर्वाधिक वेतन मिळते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच कानपूर जिल्ह्यातील आपल्या परौख गावी जात आहेत. कानपूरमधील झीझक रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ६.१० वाजता राष्ट्रपतींची विशेष ट्रेन दाखल झाली.
झीझकमध्ये त्यांनी नागरिकांना संबोधित केलं. ते म्हणाले, मी आपला आशीर्वाद घेण्यासाठी घेण्यासाठी आलो आहे. मला या रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक क्षण आठवतोय. खासदार असताना या स्टेशनवर अनेक ट्रेन थांबत होत्या. पण आता त्या थांबत नाहीत. कदाचित करोनामुळे असं झालं असेल. पण पुढील काळात ट्रेन थांबतील अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रपती म्हणाले, मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलमुळे काही प्रमाणात हे अंतर निर्माण झाले आहे. पण तुम्ही आपल्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. देशात स्वातंत्र्यानंतर मोठा विकास झाला आहे. विकासात योगदान देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पण अनेकदा धरणे आंदोलन किंवा निदर्शनांदरम्यान ट्रेन रोखल्या जातात. पेटवल्याही जातात. हे अतिशय चुकीचं आहे. रोषात येऊन अशी पावलं उचलल्याने त्याचे विपरित परिणाम कुठेना कुठे आपल्यावरच होतात.
१५ वर्षांनी राष्ट्रपती ट्रेनने प्रवास करत आहेत. यापूर्वी २००६ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ट्रेनने गेले होते. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादही कायम ट्रेनने प्रवास करत होते. राष्ट्रपती झाल्यानंतर ते बिहारमधील आपल्या जीरादोई गावात विशेष ट्रेनने गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App