सीमेपलिकडून ड्रोनद्वारे स्मगलिंग केलेली शस्त्रे जम्मू पोलीसांनी पकडली

वृत्तसंस्था

जम्मू : सीमेपलिकडून जम्मू – काश्मीरमध्ये काही ड्रोन आल्याच्या बातम्या गेल्या १५ – २० दिवसांमध्ये आल्या होत्या. यापैकी काही ड्रोन्स भारतीय सैन्य दलाने पाडली देखील. पण त्या ड्रोन्सची पहिली करामत उघड झाली आहे.  Police have foiled a bid of smuggling weapon, explosives recovering pistol & 2 hand grenades from a truck driver in Jammu. In initial probe, driver divulged that this consignment of weapon, grenades were dropped by drone from across the border to be taken to Kashmir: Jammu Police

जम्मू परिसरात पाकिस्तानी दहशतवादी ड्रोनद्वारे शस्त्रे आणि स्फोटके यांची तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. ड्रोनद्वारे भारतात टाकलेली शस्त्रे आणि हँडग्रेनेड जम्मू पोलीसांनी एका ट्रक चालकाकडून जप्त केली आहेत. ही शस्त्रे आणि हँडग्रेनेड घेऊन हा ट्रकचालक काश्मीरकडे निघाला होता.

वाटेत त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे काही पिस्तुले आणि हँडग्रेनेड्स आढळली. त्याची तपासणी केली असता ती चायनामेड असून ती सीमेपलिकडून ड्रोनद्वारे आपल्या भागात टाकण्यात आल्याची माहिती ट्रक चालकाने पोलीसांना दिली.

गेल्या काही दिवसांत जम्मूच्या सैनिकी आणि नागरी परिसरात ड्रोनच्या हालचाली मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. आता सीमेपलिकडून घुसखोरी करणे अवघड झाले आहे. भारतीय सैन्य तिथे घुसून कारवाई करते. यात दहशतवाद्यांना मोठा धोका संभवतो म्हणून ड्रोनहल्ले करण्याची नवी मोडस ऑपरेंडी दहशतवाद्यांनी अवलंबली आहे.

ड्रोनद्वारे घातक शस्त्रांचे आणि स्फोटकांचे स्मगलिंग हा त्या मोडस ऑपरेंडीमधला पहिला भाग आहे. दहशतवाद्यांचा ड्रोनद्वारे भारतात मोठे हल्ले करायचा मनसूबा आहे, असे पोलीसांनीन सांगितले.

Police have foiled a bid of smuggling weapon, explosives recovering pistol & 2 hand grenades from a truck driver in Jammu. In initial probe, driver divulged that this consignment of weapon, grenades were dropped by drone from across the border to be taken to Kashmir: Jammu Police

महत्त्वाच्या बातम्या