विशेष प्रतिनिधी
चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यातील सुरक्षेतील हलगर्जीपणाचा धोका आणखी अधोरेखित करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथे सतलज नदीत एक संशयास्पद होडी आढळून आली आहे.PM’s visit, security lapses and secrets of Pakistani boat in Sutlej river
सीमा सुरक्षा दलाने ही होडी ताब्यात घेतली असून ही होडी येथे कशी पोहचली, या होडीतून नेमकं कोण आलं, याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने गूढ वाढले आहे.दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हुसैनीवाला येथे रोखला गेला होता. ते ठिकाण येथून ५० किलोमीटर अंतरावर होते.
त्यामुळेच यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून होडीबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाचे पथक गस्त घालत असताना सतलज नदीत बीओपी टीटी मल येथे ही संशयास्पद होडी आढळून आली आहे. ही होडी स्थानिक नसून पाकिस्तानातून ही होडी आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या होडीत काहीही आढळलं नसलं तरी कसून तपास सुरू करण्यात आला आहे. काही उद्देशाने ही होडी येथे दाखल झाली असेल तर तो उद्देश नेमका काय होता, याचा शोध घेतला जात आहे. या होडीतून नेमकं कोण आलं, हेसुद्धा एक कोडे असून स्थानिक सुरक्षा यंत्रणांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तान सीमेपासून हा भाग अगदी जवळ असल्याने सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी पंजाबमधील हुसैनीवालाजवळ रोखण्यात आला होता. निदर्शक अचानक रस्त्यावर उतरल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती.
पंतप्रधानांचा ताफा २० मिनिटे एकाच ठिकाणी उभा होता. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन पंतप्रधान तिथून माघारी फिरले होते. पुढील सर्व कार्यक्रम पंतप्रधानांनी रद्द केले होते. त्याचवेळी सतलज नदीत संशयास्पद होडी आढळल्याने त्याचे धागेदोरे शोधले जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App