ध्येयपथ पर बढ रहे है : मातृदेवतेला अंतिम निरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित कार्यक्रमात सहभागी होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. परंतु ध्येयपथ पर बढ रहे है या उक्तीनुसार पंतप्रधानांनी आपले नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केलेले नसून ते आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.  PM narendramodi will join today’s scheduled programmes in West Bengal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंतिम संस्कार साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादला दाखल झाले. मोदींनी आपल्या आईचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. ते आईच्या अंतिम संस्कारात सहभागी झाले.

परंतु, पंतप्रधानांनी आपला कोणताही सर्वजनिक कार्यक्रम रद्द केला नसून ते नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज कोलकात्ता येथे नमामि गंगा परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत पंतप्रधान ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीशी जोडलेले काही कार्यक्रम आहेत या कार्यक्रमांमध्ये देखील पंतप्रधान मोदी ऑनलाईन सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

कोलकता येथे होणारी नमामि गंगा परिषद होत आहे. ज्या राज्यांमधून गंगा वाहते त्या सर्व राज्यांना एकमेकांशी जोडून घेण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांची या राज्यांमधून गंगा वाहते. या राज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने आखला आहे त्याचीच परिषद कोलकत्यामध्ये आयोजित केली आहे. या नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान प्रत्यक्ष कोलकत्यात सहभागी होणार होते. परंतु आता ते ऑनलाइन सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

PM narendramodi will join today’s scheduled programmes in West Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात