पंतप्रधान मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस


पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून लस घेतानाची छायाचित्रे शेअर केली. मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. PM Narendra Modi got second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today

https://twitter.com/narendramodi/status/1379974475278557187?s=20

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले आहेत.

मोदी म्हणतात

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अॅक्सेस नाही.

PM Narendra Modi got second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात