पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर जाणार. जी-२० बैठक तसेच ब्रिटनलाही भेट देणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ते इटलीच्या दौऱ्यावर तसेच पर्यावरणाशी संबंधित बैठकीसाठी ब्रिटनलाही जातील.PM Modi will visit Italy for G 20 metting

२९ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी इटलीच्या रोममध्ये पोहोचतील. कोरोनानंतर जागतिक आर्थिक व्यवस्थेत अपेक्षित असलेला सुधार, पुरवठा साखळी सुधारणे, पर्यावरण बदल, दहशतवाद यासारखे मुद्दे चर्चेसाठी जी-२० च्या कार्यक्रम पत्रिकेवर असून जी-२० च्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे एकाच व्यासपीठावर येतील.



याआधी मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंधाच्या मुद्द्यावर भेट झाली होती. शिवाय, क्वाड देशांच्या बैठकीच्या निमित्तानेही त्यांची चर्चा झाली होती.
चीन आणि रशिया हे देशही जी-२० चे सदस्य असले तरी दोन्ही देशांचे प्रमुख अनुक्रमे शी जीनपिंग आणि पुतीन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

PM Modi will visit Italy for G 20 metting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात