पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

Pm Modi Seeks List Of Mp Who Were Absent In Rajya Sabha Monsoon Session

Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि यादी मागितली आहे. Pm Modi Seeks List Of Mp Who Were Absent In Rajya Sabha Monsoon Session


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि यादी मागितली. खरं तर सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2021 सादर केले होते. या विधेयकाला विरोध होऊन निवड समितीकडे पाठवण्याची मागणी झाली. विरोधकांच्या मागणीवर राज्यसभेत मतदान झाले, त्यादरम्यान काही भाजप खासदार गायब होते, ज्यावर पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त करत, अनुपस्थित खासदारांची यादी मागितली आहे.

मतदानादरम्यान अनेक खासदार बेपत्ता

निवड समितीकडे विधेयक पाठवण्याच्या बाजूने 44 मते पडली, तर त्याच्या विरोधात 79 मते पडली. अशाप्रकारे विरोधकांची मागणी रद्द करण्यात आली आणि हे विधेयक काही काळानंतर मंजूर करण्यात आले, परंतु या मतदानावेळी काही भाजप खासदार तेथे उपस्थित नव्हते. पंतप्रधान मोदींनी केवळ अशा खासदारांची यादी मागितली आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी खासदारांना आपापल्या मतदारसंघात खेळांना प्रोत्साहन देण्याचेही सांगितले.

Pm Modi Seeks List Of Mp Who Were Absent In Rajya Sabha Monsoon Session

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात