खेळाला प्राधान्य : पंतप्रधान मोदींकडून भारताच्या ऑलिंपिक तयारीचा आढावा; खेळाडूंशी ऑलिंपिकला जाण्यापूर्वी संवाद साधणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी यश मिळविले की पंतप्रधान, राष्ट्रपतींना पदके दाखवायची आणि त्यांनी खेळाडूंचे कौतूक करायचे. पब्लिसिटीच्या फोटोग्राफरने त्याचे फोटो छापून आणायचे, ही आजवरची राजधानीतली प्रथा राहिली आहे… त्या प्रथेला आज प्रथमच फाटा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या ऑलिंपिक तयारीचा आढावा स्वतः घेतला. PM Modi reviewed India’s Olympics preparations today.PM was briefed that a total of 100 athletes have qualified for Tokyo Olympics across 11 sports disciplines

११ क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे १०० खेळाडू टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. आणखी २५ खेळाडू पात्र ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांनी पंतप्रधानांसमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत दिली. पॅरा ऑलिंपिकसाठी २६ खेळाडू पात्र ठरले आहेत. आणखी २६ खेळाडू पात्र ठरू शकतात, असेही यावेळी सांगण्यात आले.



टोकियो ऑलिंपिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. पंतप्रधानांनी खेळाडूंचे कोरोना काळातील ट्रेनिंग, लसीकरण, सुरक्षा उपाययोजना, आहार – विहार, वैद्यकीय सुविधा यासंबंधीची माहिती घेऊन काही सूचना केल्या.

एखाद्या अत्यंत महत्त्वाचा क्रीडा स्पर्धेआधी स्वतः पंतप्रधानांनी आढावा बैठक घेण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. सर्व खेळाडू ऑलिंपिकला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जिंकण्यासाठी प्रोत्साहन देतील, त्यासाठी जुलै महिन्यातील वेळ राखून ठेवला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

PM Modi reviewed India’s Olympics preparations today.PM was briefed that a total of 100 athletes have qualified for Tokyo Olympics across 11 sports disciplines

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात