ममता मोदींवर भडकल्या, आधी त्यांना liar म्हणाल्या, नंतर sorry म्हणून मोकळ्या झाल्या…!!


वृत्तसंस्था

वाराणसी – कोलकाता – बंगालमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सुप्रिम कोर्टात आणि कोलकाता हायकोर्टात अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली सगळी भडास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काढून घेतली. यावेळी त्यांना निमित्त मिळाले, उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या राजवटीची मोदींनी स्तुती केली त्याचे. PM Modi knows very well that there is no rule of law in UP.

वाराणसीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या सरकारची स्तुती केली. योगींनी फक्त कोविड परिस्थितीच उत्तम हाताळली असे नव्हे, तर उत्तर प्रदेशातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती देखील उत्तम हाताळली आहे, असे प्रशस्तीपत्र मोदींनी योगींन दिले.

उत्तर प्रदेशात पूर्वी गुंडांचे राज्य चालायचे. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यांना त्यांच्या जागेवर अर्थात तुरूंगात पाठविण्यात आले आहे. महिलांकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना पोलीस शासन करीत आहेत, असे मोदी वाराणसीत म्हणाले.

या बाबत कोलकात्याच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींना प्रश्न विचारल्यावर त्या मोदींवर भडकल्या. त्या म्हणाल्या, की मोदी बंगालची बदनामी करतात. पण उत्तर प्रदेशात उन्नावपासून हाथरसपर्यंत विविध घटना घडल्यात. तेव्हा मोदींनी किती वेळा सीबीआय, ईडी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, अल्पसंख्यांक आयोगाची माणसे तिथे तपास करायला पाठविली. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्यच नाही. तिथे गुंडांचेच राज्य आहे. पण मोदी liar (खोटारडे) आहेत. म्हणून ते बंगालची निंदा करतात. बंगालला कारण नसताना बदनाम करतात.

आपल्या संतत्प उत्तराच्या भरात ममता या मोदींनी liar म्हणजे खोटारडे म्हणून गेल्या. पण हा असंसदीय शब्द असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्वतःला सावरून sorry म्हणून टाकले. पण पंतप्रधान मोदींवरचे शरसंधान त्यांनी कमी केले नाही.

बंगालमध्ये जो हिंसाचार झाला, त्याला कारणीभूत निवडणूक आयोग आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी निव़डणूक आयोगाची होती. हिंसाचाराशी आमचा संबंध नाही. निवडणूकीनंतरच्या हिंसाचाराशी देखील आमचा संबंध नाही.

तरीही बंगालमध्ये केंद्रीय संस्था, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे लोक पाठविले. त्याचे रिपोर्ट्सही परस्पर लीक केले. ते हायकोर्टाचा आणि सुप्रिम कोर्टाचा देखील आदर करीत नाहीत. अर्थात कोर्टात आम्हाला देखील बाजू मांडण्याची संधी आहे, याकडे ममतांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

PM Modi knows very well that there is no rule of law in UP.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण