वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ८ फेब्रुवारी २०२३ रोजी संसदेत परिधान केलेले प्लॅस्टिक बाटल्यांच्या फेरवापरातून तयार केलेल्या कापडाचे जॅकेट येत्या ३ महिन्यांमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. प्लॅस्टिकचे मोदी जॅकेट ३ महिन्यांत प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (IOCL) अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी बंगळुरुमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये दिली आहे. हे जॅकेट तयार करण्याचा खर्च २००० रुपयांपर्यंत येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इंडियन ऑईलच्या ‘अनबॉटल’ उपक्रमांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (6 फेब्रुवारी) बंगळुरु इथे सुरु असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या गणवेशाचे लोकार्पण केले होते. त्यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना निळ्या रंगाचे जॅकेट भेट दिले. हेच जॅकेट घालून मोदी काल लोकसभेत बसले होते. मोदींच्या प्लॅस्टिक जॅकेटचे फोटो प्रचंड व्हायरल झाले.
प्लॅस्टिकची बाटली, मोदी जॅकेटवर “अशी” सजली : मोदींच्या अनोख्या जॅकेटचा फोटो प्रचंड व्हायरल
या पार्श्वभूमीवर मोदींचे हे प्लॅस्टिक जॅकेट सर्वसामान्यांसाठी केव्हा उपलब्ध होणार, त्याची किंमत काय असणार, याची उत्सकुता सर्वांना आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा इंडियन ऑईल कंपनीचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी केला आहे.
ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत वैद्य म्हणाले की, ३ महिन्यांच्या आत प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले जॅकेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. लोक IOCL, BPCL आणि HPCL सारख्या तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) रिटेल आऊटलेटवर हे जॅकेट खरेदी करु शकतील. वैद्य म्हणाले की, प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेली उत्पादने केवळ तेल विपणन कंपन्या किंवा लष्कराच्या जवानांपुरते मर्यादित राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेले जॅकेट परिधान करुन पर्यावरण वाचवण्याबाबत मोठा संदेश दिला आहे.
तामिळनाडूच्या कंपनीने तयार केले कापड
पंतप्रधानांचे जॅकेट तयार करण्यासाठी सुमारे 15 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापरल्या. या फायबरचे कापड तामिळनाडूच्या करुर शहरातील कंपनीने तयार केले. श्री रंग पॉलिमर्स नावाच्या या कंपनीने पेट (Pet) बॉटलच्या पुनर्वापरातून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे इंडियन ऑइलला पाठवले होते. त्यातून पीएम मोदींसाठी कपड्यांचा रंग निवडला. यानंतर हे कापड गुजरातमधील टेलरकडे पाठवले, जो पंतप्रधान मोदींचे कपडे तयार करतो. त्या टेलरने या कपड्यातून नरेंद्र मोदींचं जॅकेट तयार केले, जे नंतर पंतप्रधानांना भेट दिले.
कसे शिवले जॅकेट?
असे जॅकेट बनवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या धुतल्यानंतर त्या अगदी बारीक कापल्या जातात. यातून मिळणाऱ्या प्लास्टिक फायबरपासून धागा तयार केला जातो. या फायबरच्या धाग्याचे हातमाग यंत्राद्वारे धाग्यात रुपांतर केले जाते. यादरम्यान रंगरंगोटी करताना पाण्याचा वापर केला जात नाही. सामान्य कापडाप्रमाणे शिवून ड्रेस तयार केला जातो. जॅकेटसह संपूर्ण ड्रेस तयार करायचा असल्यास 28 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेतून जॅकेट तयार करण्यासाठी फक्त २०००2 रुपये खर्च येतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App