प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय घमासान सुरू असताना शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपच्या उमेदवारांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता भाजपने आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि फडणवीस सरकार मधले माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ विद्यमान खासदार विनय सहस्रबुद्धे यांना वगळण्यात आल्याचे मानण्यात येत असून भाजपने तिसऱ्या जागेबाबत अजूनही सस्पेन्स ठेवला आहे. Piyush Goyal, Dr. BJP’s candidature to Anil Bonde
गोयल, बोंडेंना उमेदवारी
राज्यसभेच्या 57 जागांपैकी महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर विधानसभेत संख्याबळ जास्त असलेल्या भाजपकडून कोणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपने पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे.
तिसरा उमेदवार देणार?
पण भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी चर्चा सुरू असतानाच अजूनही तिस-या नावाची घोषणा भाजपने केलेली नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण ऐनवेळी भाजपकडून तिस-या नावाची घोषणा करण्यात आली तर ही निवडणूक रंगण्याची चिन्ह वर्तवण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App