भारतीय औषधांचा जगभर डंका, फार्मा कंपन्यांच्या निर्यातीत १८ टक्यांनी वाढ, २४.४ बिलियन डॉलर्सची औषधे झाली निर्यात

कोरोनाकाळातही भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १८ टक्यांनी वाढ झाली आहे. तब्बल २४.४ बिलियन डॉलर्स औषधांची निर्यात झाली आहे.Pharmaceutical exports of Indian pharmaceuticals rise by 18 per cent to २४ 24.4 billion


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोनाकाळातही भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १८ टक्यांनी वाढ झाली आहे. तब्बल एक लाख ८२ हजार १७६ कोटी रुपयांनी औषधांची निर्यात झाली आहे.

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी ३४ टक्के निर्यात अमेरिकेला होती. फॉर्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. कौन्सिलने म्हटले आहे की २०२१ च्या मार्च महिन्यात निर्यातीत सर्वाधिक वाढ झाली आहे.



या काळात २.३ बिलीयन डॉलर्स झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही ४८.५ टक्के वाढ आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यात जगभरात लॉकडाून होता. त्यामुळे सप्याय चैन विस्कळित झाली होती. त्यामुळे ही वाढ खूप जास्त दिसत आहे.

मात्र, तरीही या काळात जागतिक पातळीवरील फार्मा मार्केटमध्ये एक ते दोन टक्यांनी घट झाली आहे. भारताील जेनरिक औषधांची गुणवत्ता आणि कमी किंमत यामुळे मागणी वाढली आहे. मात्र, आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लसीची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

त्याचबरोबर देशांतर्गत मागणी वाढल्याने फार्मा सेक्टरमध्ये मोठी वाढ होणार आहे. याचे कारण म्हणजे जगातील बहुतांश देश हे भारतीय लसीवर विश्वास ठेवणार आहेत. अमेरिकेपाठोपाठ कॅनडातील निर्यातीत ३० टक्के तर मेक्सिकोला होणाऱ्या निर्यातीत २१.४ टक्के निर्यात झाली आहे.

दक्षिण अफ्रिका भारतातील औषधांचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आहे. या देशातील निर्यातीत २८ टक्के वाढ झाली आहे.

Pharmaceutical exports of Indian pharmaceuticals rise by 18 per cent to २४.४ billion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात