भारताशेजारच्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त, दरवाढीमुळे जनतेचे बजेट कोलमडले; काँग्रेस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात इंधन दरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. पोटनिवडणुकीनंतर केंद्र सरकारने करात कपात केली. मात्र, विरोधी पक्षांनी सरकारकडे इंधन दर आणखी कमी करण्याची मागणी केली आहे. शेजारच्या देशांमध्ये इंधन दर भारतापेक्षाही कमी असल्याचे काँग्रेसने म्हटले. Petrol and diesel became cheaper in neighboring India, causing public budgets to collapse; Congress

काँग्रेसने अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतान या देशांतील पेट्रोल आणि डिझेल दराचे आकडे प्रसिद्ध करून भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने याबाबतचे ट्विट केले आहे. श्रीलंकेत पेट्रोलची किंमत ६८.२ रुपये प्रति लीटर असून डिझेलची किंमत ४१.१ रुपये प्रति लीटर आहे.अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत ६२.५ रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत ५७.६ रुपये प्रती लीटर इतकी आहे. बांगलादेशमध्ये पेट्रोलची किंमत ७७.७ रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत ५६.८ रुपये प्रती लीटर आहे.

पाकिस्तानमध्येही पेट्रोलचा प्रति लीटर दर ६०.०१ रुपये असून डिझेलची किंमत ५८.७ रुपये प्रति लीटर आहे. नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रती लीटर ८१.२ रूपये असून डिझेलची किंमत ७०.०५ रुपये प्रती लीटर आहे.

Petrol and diesel became cheaper in neighboring India, causing public budgets to collapse; Congress

महत्त्वाच्या बातम्या