वृत्तसंस्था
श्रीनगर – जम्मू – काश्मीरविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर श्रीनगरमध्ये होणारी गुपकार गटाची उद्या (मंगळवारी) बैठक रद्द करून ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.People’s Alliance for Gupkar Declaration (PAGD) meeting that was scheduled for tomorrow stands cancelled because of personal engagement of Mehbooba Mufti: Sources
पण ही महत्त्वपूर्ण बैठक रद्द करण्यामागील कारण मात्र, वेगळे सांगितले गेले. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना वैयक्तिक काम असल्याने ही बैठक पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले आहे. बैठकीच्या पुढच्या तारखेविषयी देखील कोणते भाष्य करण्यात आलेले नाही.
३७० कलम पुन्हा लागू केल्याशिवाय आणि जम्मू – काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा दिल्याशिवाय निवडणूक लढविणार नाही, अशी पीडीपीची भूमिका मेहबूबा मुफ्ती यांनी आधीच जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांनी निवडणूक लढविण्याचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे.
https://twitter.com/VishalJ79294150/status/1409478070109495303?s=20
या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी उद्या गुपकार गटाची बैठक होणार होती. पण मेहबूबांना वैयक्तिक काम निघाल्याने ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली. मेहबूबांच्या बहिणीची आणि आईची संपत्तीवरून ईडीची चौकशी सुरू आहे. तिच्यामध्ये त्या गुंतल्या असल्याची बातमी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App