गोवेकरांच्या झोपेची चिदंबरम यांना चिंता; “झोपलेली” काँग्रेस उठवा; प्रमोद सावंतांचे प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून भाजपने बहुमतासह सरकार स्थापन केल्यानंतर देखील काँग्रेसच्या नेत्यांचे अस्वस्थता गेलेली नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना गोव्यात भाजप सरकार आल्यानंतर गोवेकरांच्या शांत झोपेची चिंता लागून राहिली आहे.People have also given a clear mandate to BJP, rejecting the Congress.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर चिदंबरम यांनी ट्विट करून भाजपला टोचले आहे. गोव्यात “असे” सरकार आले आहे, की त्यामुळे गोवेकरांना रात्री शांत झोप लागली नसेल. प्रमोद सावंत, रवी राणे, बाबूश मोन्सेरात असे मंत्री मिळाल्यावर गोव्याचा विकासाचे काय होणार?, याची चिंता गोवेकरांना भेडसावत आहे. त्यामुळे गोवेकरांच्या रात्री शांत झोप येईना, असे खोचक ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.

चिदंबरम यांच्या खोचक ट्विटला डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील तसेच खोचक प्रत्युत्तर दिले आहे. चिदंबरम हे 106 कोठडीत होते. त्यांनी गोवेकरांच्या शांत झोपेची चिंता करू नये. त्याऐवजी त्यांनी “झोपलेली” काँग्रेस उठवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या पक्षाला अजून खात्रीचे नेतृत्व मिळत नाही. गोव्याच्या जनतेने भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्ता दिली आहे आणि काँग्रेसला हरविले आहे, अशा शब्दात डॉ. प्रमोद सावंत यांनी चिदंबरम यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे.

People have also given a clear mandate to BJP, rejecting the Congress.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात