विशेष प्रतिनिधी
पाटणा : पाटण्यातून जन चळवळ निर्माण होते, हे राहुल गांधींनी सांगितलेले अर्धसत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी पूर्ण केले आणि जयप्रकाशजींचे नाव घेऊन काँग्रेसला डिवचले!! विरोधी ऐक्याच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हे घडले.Pawar fulfilled Rahul Gandhi’s half-truth of mass movement from Patna
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने 15 विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी दिल्लीत विरोधकांची बैठक झाली, मात्र ती अपयशी ठरली. पण पाटण्यात जी बैठक होते, ती नंतर जन चळवळ बनते, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. पण ती जन चळवळ जयप्रकाश नारायण यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सुरू केली होती, हा इतिहास राहुल गांधी सोईस्कररित्या विसरले.
पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, त्याची जन चळवळ बनते; राहुल गांधींनी सांगितलेला हा इतिहास अर्धाच… मग पूर्ण इतिहास काय??
पण शरद पवार मात्र तो इतिहास विसरले नाहीत. राहुल गांधींनी सांगितलेले जन चळवळीचे अर्धसत्य शरद पवारांनी पत्रकार परिषदेत जयप्रकाश नारायण यांचे नाव घेऊन पूर्ण केले. पाटण्यातून जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली मोठी जन चळवळ उभी राहिली आणि तिने संपूर्ण देशात परिवर्तन घडविले, याची आठवण पवारांनी पत्रकार परिषदेत करून दिली. त्यावेळी शरद पवार हे इंदिरा गांधींच्या काँग्रेस बरोबर नव्हते, तर ते विरोधात होते. हा संदर्भ येथे महत्त्वाचा आहे.
संयोजक पदाबाबत एकमत नाही
मात्र शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोधकांच्या बैठकीला आणि नंतरच्या पत्रकार परिषदेला हजर राहून देखील विरोधी आघाडीच्या संयोजक पदाबाबत मात्र एकमत होऊ शकले नाही. आता संयोजक पदावर एखाद्या नेत्याची नियुक्ती करण्यासाठी हे सर्व नेते हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे भेटणार आहेत. सिमलातल्या बैठकीत सर्व विरोधक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पण आजच्या पत्रकार परिषदेत जयप्रकाश नारायण यांचे नाव घेऊन शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला डिवचल्याने सिमल्यातल्या बैठकीत त्यांनाच ज्येष्ठतेचा सन्मान देऊन विरोधी आघाडीच्या संयोजक पदी नेमतील का??, काँग्रेस त्यांना मनापासून स्वीकारेल का??, याविषयी फार मोठी शंका तयार झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App